Home वणी परिसर वणी ही अध्यात्मिक नगरी — डॉ दिलीप भुजबळ

वणी ही अध्यात्मिक नगरी — डॉ दिलीप भुजबळ

182

वणीत शांतता समिती सभा

वणी बातमीदार :- वणी शहरात  सण उत्सव सर्व जाती धर्माचे नागरिक एकत्रित येऊन साजरा करतात. सद्गुरू जगन्नाथ महाराज यांची ही भूमी आहे. त्यामुळे  वणी ही औद्योगिक नगरी सह अध्यात्मिक नगरी असल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ दिलीप पाटील भुजबळ  यांनी केले ते शांतता समितीच्या आढावा बैठकीत बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर उपविभागीय अधिकारी डॉ शरद जावळे, उपविभागिय पोलीस अधिकारी संजय पूजलवार उपस्थित होते येथील शेतकरी भवन सभागृहात आगामी येणारे सण उत्सव शांततेत पार पडावे या करिता सभा घेण्यात आली होती.

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ भुजबळ पुढे बोलताना म्हणाले की सणोत्सव सामाजिक कार्यातून प्रबोधन करण्यासाठी आहेत. यासाठीच या उत्सवांची निर्मिती झाली आहे. आज देशाला स्वातंत्र मिळून 75 वर्ष झाली आपला देश उन्नती कडे चालला आहे. हे सर्व नागरिकांच्या सहकार्याने शक्य झाले आहे.

आता पुढील महिन्यात गणेशोत्सव साजरा होणार आहे. अनेक गणेश मंडळ गणेशाची स्थापना करतील.गणेश मंडळातील पदाधिकाऱ्यां मधून एखादे युवा नेतृत्व तयार व्हावे ही भूमिका ठेवली पाहिजे डॉ भुजबळ यांनी येणारे सण उत्सव शांततेत पार पाडावे असे आवाहन केले.

यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ शरद जावळे व उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूजलवार  यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. रोटरी क्लब, मराठा सेवा संघ, पोलीस पाटील संघटना व शांतता कमिटीच्या वतीने डॉ भुजबळ यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक ठाणेदार वैभव जाधव यांनी केले यावेळी शहरातील गणमान्य नागरिकां सह वणी विभागातील ठाणेदार उपस्थित होते