Home Breaking News कीटकनाशक प्राशन, उपचारादरम्यान मृत्यू

कीटकनाशक प्राशन, उपचारादरम्यान मृत्यू

724

आत्महत्येचे कारण अस्पष्ट

वणी: मारेगाव तालुक्यातील वेगाव येथे वास्तव्यास असलेल्या 28 वर्षीय तरुणाने कीटकनाशक प्राशन केले. ही बाब घरच्यांना कळताच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा शनिवार दि. 20 ऑगस्टला मृत्यू झाला.

अविनाश जीवन मेश्राम (28) असे मृतकाचे नाव आहे. तो मारेगाव तालुक्यातील वेगाव येथील निवासी होता. रोजमजुरी करून तो आपल्या परिवाराचा गाडा हाकत होता. शुक्रवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास त्याने कीटकनाशक प्राशन केले.

ही बाब घरच्या मंडळींना कळताच त्याला तातडीने मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर ला हलवले. शनिवारी पहाटे उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून मारेगाव पोलीस तपास करत आहे.
वणी: बातमीदार