Home वणी परिसर दुचाकी चोरट्याच्या आवळल्या मुसक्या

दुचाकी चोरट्याच्या आवळल्या मुसक्या

548
C1 20240404 14205351

तीन दुचाकी हस्तगत

वणी- गेल्या दोन महिन्यात शहरातून दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले होते. या बाबत वणी पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आल्या होत्या. पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला असून वरोरा तालुक्यातील अर्जुनी चारगाव येथील चोरट्याला चंद्रपूर वरून ताब्यात घेण्यात आले आहे.

राजू उर्फ राजकुमार बालाजी दुर्वे (28) असे अटकेतील दुचाकी चोरट्याचे नाव आहे. शहरातील शास्त्री नगर येथे वास्तव्यास असलेले प्रतीक गोहणे यांची MH-29-BB-4888  या क्रमांकाची दुचाकी दि.14 सप्टेंबर ला पहाटे चोरीला गेली. तसेच सुतारपुरा येथील सतीश पवार यांची दुचाकी क्रमांक MH-29 -BA-6601 ही दि.28 ऑगस्ट ला तर घुग्गुस येथील गणेश कातरकर यांची दुचाकी क्रमांक MH-29AR-9670 ही 29 ऑगस्ट ला चोरून नेल्याची तक्रार वणी पोलिसात दाखल केली होती.

पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा नोंद करून तपासाला सुरुवात केली. चोरटा चंद्रपूर येथे असल्याची माहिती मिळताच ठाणेदार शाम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली डोमजी भादीकर, संजय शेंद्रे, शंकर चौधरी यांनी चांद्रपुरातून दुचाकी चोरटा दुर्वे याच्या मुस्कय आवळल्या तर तीन दुचाकी हस्तगत केल्या आहेत.