Home वणी परिसर पट्टेदार वाघाचा मुक्तसंचार, गायीचा पाडला ‘फडशा’

पट्टेदार वाघाचा मुक्तसंचार, गायीचा पाडला ‘फडशा’

390

आडकोली शेतशिवारातील घटना

मुकुटबन- जामणी वनपरिक्षेत्रात येत असलेल्या ‘आडकोली’ गावालगतच्या शेतशिवारात दि. 19 सप्टेंबर ला पट्टेदार वाघाने गायीवर हल्ला चढवून ठार केल्याची घटना सोमवारी उघडीस आली. पट्टेदार वाघाच्या मुक्तसंचारामुळे आडकोली परिसरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आडकोली वनवर्तुळात मागील काही दिवसांपासून पट्टेदार वाघाचा वावर बिनधास्त सुरू आहे. तर शेतशिवारात शेतीकाम करणाऱ्या शेतीकऱ्यांना व जंगलात चराईसाठी जनावरे घेऊन जाणाऱ्या गुराख्याना मुक्तसंचार करणाऱ्या पट्टेदार वाघाचे दर्शन दररोज होत आहेत. या दरम्यान 19 सप्टेंबर ला सायंकाळी 06 :30 वाजताचे सुमारास शेतकरी ‘सुहास दादाजी नांदेकर’ यांच्या मालकीच्या गीर जातीच्या गायी, गुराखी शेतातील धुऱ्यावर चारत असतांना, कळपातील गीर जातीची एक गाय आढळून आली नाहीत. गुराख्याने सतर्कतेने गायीचा शोध घेतला असता, शेतालगत जंगलात गाय मृतावस्थेत दिसली. गायीला वाघाने ठार केल्याचा कयास लावत गुराख्याने शेतमालकाला याची माहिती दिली.

पट्टेदार वाघाने गायीला ठार केल्याची माहिती वनविभागाला देण्यात आली. गीर जातीची गाय ठार झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आथिर्क नुकसान झाले आहेत. यांची नुकसान भरपाई देण्याच्या मागणी सह परिसरात मुक्त संचार करणाऱ्या पट्टेदार वाघाचा बंदोबस्तात करावा अशी मागणी करण्यात आली आहे.

Previous articleगणेश भक्तांना मास्क चे वाटप
Next articleदुचाकी चोरट्याच्या आवळल्या मुसक्या
Whatsapp Image 2021 07 18 At 1.43.51 Pm (1)
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.