Home Breaking News अवैध धान्‍य खरेदी, भुमीपुञ ट्रेडर्सवर धाडसञ

अवैध धान्‍य खरेदी, भुमीपुञ ट्रेडर्सवर धाडसञ

● APMC व AR  पथकाची संयुक्‍त कारवाई ● बाजारशुल्‍क व दंड करणार वसुल

2034
C1 20231120 17080226

APMC व AR  पथकाची संयुक्‍त कारवाई
बाजारशुल्‍क व दंड करणार वसुल

Wani News | शेतकऱ्यांचा शेतमाल बाजारात यायला लागला आहे. व्‍यापारी अवैधरित्‍या शेतकऱ्यांकडून मोठया प्रमाणात शेतमालीची खरेदी करतांना दिसत आहे. लगतच असलेल्‍या चिखलगांव येथील भुमीपुञ ट्रेडर्स मध्‍ये धान्‍य खरेदी होत असल्‍याची माहिती बाजार समिती व सहाय्यक निबंधक यांना मिळताच सोमवारी दुपारी 1 वाजता संयुक्‍तरित्‍या धाडसञ अवलंबले. यावेळी तेथे शेकडो पोते धान्‍य अवैद्यरित्या खरेदी केलेले आढळुन आले आहे. Traders are seen buying large quantities of agricultural produce from farmers illegally.

धान्‍य खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी बाजार समितीच्‍या यार्ड मधुनच शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करावा असा नियम आहे. यामुळे कोणत्‍याही शेतकऱ्यांची फसवणुक होत नाही. तसेच बाजार समितीला बाजार शुल्‍क मिळते. परंतु बाजारशुल्‍क वाचविण्‍याच्‍या नादात व्‍यापारी ठिकठिकाणी गोडावून थाटून अवैधरित्‍या शेतमालाची खरेदी करतांना आढळुन येत आहे.

चिखलगांव येथील भुमीपुञ ट्रेडर्सचे संचालक चंद्रशेखर देठे यांनी बाजार समिती यार्डा बाहेर पणन मार्फत मिळणारे शेतमाल खरेदी बाबतचा परवाना घेतलेला नाही. त्‍यांचे जवळ बाजार समितीचा परवाना असुन त्‍यांनी बाजार समितीत अत्‍यल्‍प शेतमाल खरेदी केलेला आहे.

भुमीपुञ ट्रेडर्स मध्‍ये मोठया प्रमाणात शेतमालाची अवैधरित्‍या खरेदी होत असल्‍याची माहिती बाजार समितीचे सचिव अशोक झाडे यांना मिळाली. त्‍यांनी याप्रकरणी सहाय्यक निबंधक यांना सुचित केले. बाजार समिती व सहाय्यक निबंधक कार्यालयाने संयुक्‍त पथक तयार करुन दुपारी धाडसञ अवलंबले असता भुमीपुञ ट्रेडर्सच्‍या गोदामात 500 पोत्‍याच्‍यावर धान्‍य आढळुन आले.

सदर कारवाई सहाय्यक निबंधक सचिन कुडमेथे,  बाजार समितीचे सचिव अशोक झाडे, सह अधिकारी शैलेश मडावी, बाजार समितीचे कर्मचारी रमेश पुरी यांनी केली. वृत्‍त लिहे पर्यंत पंचनामा व कारवाई पुर्ण व्‍हायची होती परंतु सर्व धान्‍याचे मोजमाप व त्‍याची किंमत यावर आधारीत बाजार शुल्‍क व दंडात्‍मक कारवाई करण्‍यात येणार असल्‍याचे बाजार समितीचे सचिव अशोक झाडे यांनी सांगीतले.
Rokhthok News

Previous articleदोन ट्रक एकमेकांवर धडकले, एक ठार
Next articleबस स्थानकावरून दुचाकी लंपास
Whatsapp Image 2021 07 18 At 1.43.51 Pm (1)
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.