Home Breaking News दोन ट्रक एकमेकांवर धडकले, एक ठार

दोन ट्रक एकमेकांवर धडकले, एक ठार

● पुरड जवळ घडली घटना

1887
Image Search 1700459926947

पुरड जवळ घडली घटना

Accident News Wani | तालुक्‍यातील पुरड परिसरात सुसाट ट्रक ने समोर जात असलेल्‍या ट्रकला जबर धडक दिली. या घटनेत 23 वर्षीय चालकांचा मृत्‍यू झाला आहे. ही घटना सोमवार दिनांक 20 नोव्‍हेंबरला पहाटे पाच वाजताच्‍या दरम्‍यान घडली.The 23-year-old driver has died. The incident took place on Monday, November 20, around five in the morning.

हरिसिंग मोहनसिंग यादव (23) असे मृतक ट्रक चालकांचे नांव आहे. तो धवलीसागर जि. ललीतपुर उत्‍तरप्रदेश येथील रहिवाशी होता तर येथील HRG कंपनीत तो चालक म्‍हणुन कर्तव्‍यावर होता.

कोळसा खाणीतुन उत्‍खनन झालेला कोळसा रेल्‍वे सायडिंगवर पोहचविण्‍याचे काम एचआरजी या कंपनीने घेतले आहे. त्‍या कंपनीच्‍या ट्रकवर हरिसिंग चालक म्‍हणुन कार्यरत होता. घटनेच्‍या दिवशी कोळसा खाली करुन तो आपल्‍या ट्रकसह मुंगोली कोळसा खाणीकडे जात असतांना पुरड गावाजवळील गतीरोधकावर त्‍याच्‍या ट्रकने समोरील ट्रकला धडक दिली.

अपघात भिषण होता, स्‍थानिक नागरीकांनी त्‍याला बाहेर काढुन रुग्‍णांलयात हलवले व पोलीसांना सुचित करण्‍यात आले. पोलीस उपनिरिक्षक रामेश्‍वर कांदुरे यांनी घटनास्‍थळ गाठत पंचनामा केला असुन याप्रकरणी पोलीसात गुन्‍हा नोंद करण्‍याची प्रक्रीया सुरु आहे.
ROKHTHOK NEWS