Home Breaking News पोलिसांची धाड, तिघे ताब्यात, 30 हजाराचा मुद्देमाल जप्त

पोलिसांची धाड, तिघे ताब्यात, 30 हजाराचा मुद्देमाल जप्त

871

सुगंधित तंबाखू, कोंबड बाजार पुढील लक्ष्य

रोखठोक | मटका अड्डा धारक व अन्य अवैद्य व्यावसायिक पुन्हा आपला जम बसविण्याच्या तयारीत आहेत. शहरात काही ठिकाणी लपूनछपून मटका अड्डे सुरू आहेत. याबाबत ठाणेदार प्रदीप शिरस्कार यांना मिळालेल्या ‘टीप’ च्या आधारे सोमवार दि. 19 डिसेंबर ला दुपारी पोलिसांनी केलेल्या कारवाईत तिघांना ताब्यात घेत 30 हजाराचा मुद्देमाल जप्त केला.

लक्ष्मण बापुराव झाडे (34), रंगनाथ नगर, मोहम्मद अहेसान मोहम्मद खलील (48) एकता नगर व दयाराम फल्ले यादव (47) राजुर कॉलरी या तिघांना मटका अड्डया वरून पट्टी फाडत असताना ताब्यात घेण्यात आले तर त्यांचे जवळून मटका साहीत्य व नगदी असे 30 हजार 830 रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

मागील काही कालावधी पासून ‘रामभरोसे’ असलेल्या वणी ठाण्यात नव्यानेच रुजू झालेल्या ठाणेदारांसमोर अवैद्य धंद्याचे उच्चाटन करण्याचे आव्हान आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीत लपूनछपून चालणारे मटका, जुगार, सुगंधित तंबाखू, कोंबड बाजार, भंगारचोरी, गोवंश तस्करी असे अवैद्यधंदे संपुष्टात यावे याकरिता पोलिसांना सतर्क रहावे लागणार आहे.

ठाणेदार प्रदीप शिरस्कार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे भाजी मंडी परिसरातील मटका अड्डयावर पोलिसांनी धाड टाकली. तेथून दोघांना ताब्यात घेतले तर सिंधी कॉलोनी परिसरातुन एकाला उचलले. या कारवाईत मटका अड्डयावर काम करणाऱ्यावर गुन्हे दाखल केले त्या प्रमाणेच मालकांवर कारवाई केली तर काही प्रमाणात वचक बसेल.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुजलवार यांचे मार्गदर्शनात, ठाणेदार प्रदिप शिरस्कार यांचे आदेशानुसार सपोनि माधव शिंदे, डोमाजी भादीकर, सुहास मंदावार, हरींद्र भारती यांनी केली.
वणी : बातमीदार