Home यवतमाळ रोटरीने घेतला वृक्षारोपणाचा ‘वसा’

रोटरीने घेतला वृक्षारोपणाचा ‘वसा’

173

वणी बातमीदार :

रोटरी क्लब ब्लॅक डायमंड सिटी च्या वतीने येथील नांदेपेरा मार्गावर रोटरीचे अध्यक्ष विनोद खुराणा, रोटरीचे प्रांतपाल रमेश महेर व राजेंद्र खुराणा यांच्या उपस्थितीत  वृक्षारोपण करण्यात आले.

वृक्षारोपण ही काळाची गरज बनली आहे, दरवर्षी अनेक सामाजिक संघटना कडून वृक्षारोपण केल्या जाते मात्र वृक्षारोपण केलेल्या झाडाची काळजी घेतल्या जात नाही. त्यामुळे वृक्षाचे संगोपन होत नाही मात्र येथील रोटरी क्लब ब्लॅक डायमंड सिटी शाखेने वृक्षारोपणासह संगोपणाचा वसा घेतला आहे. दि 18 जुलै ला येथील नांदेपेरा मार्गावर 50 झाडे लावून वृक्षारोपण करण्यात आले यावेळी रोटरी क्लब चे प्रकल्प अधिकारी निकेत गुप्ता,अनिल उत्तरवार, सदस्य अरुण कावडकर, संदीप जैस्वाल, निखिल केडीया, अंकुश जैस्वाल, लवली लाल, प्रकाश कावडे, लक्ष्मण उरकुडे, मयूर अग्रवाल, संजय छाजेड, गौरव जोबनपुत्रा, आचल जोबनपुत्रा, असलम चिनी, अश्विन कोंडावार, धन्नू अग्रवाल, हिमांशू बतरा उपस्थित होते याप्रसंगी दिलीप कोरपेनवार, सागर जाधव यांचे सहकार्य लाभले.

Next articleभुमीपूजन, लोकार्पणा बाबत ‘राजशिष्टाचार’ पाळा
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.