विरकुंड येथील घटना
वणी बातमीदार :-तालुक्यातील विरकुंड येथील 66 वर्षीय इसमाला गावातील 22 वर्षीय युवकाने लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना दि 24 जुलै ला घडली.
विरकुंड येथील कवडू काशिनाथ मोतेकर वय 66 हे 24 जुलै ला सायंकाळी 5 वाजताचे सुमारास गावातील बस स्टॉप कडे जात जात असतांना सतीश अशोक थेरे वय 22 याने त्यांना मागून लाथ मारून खाली पाडले व त्याच्या छातीवर बसून त्यांना जबर मारहाण केली, यामध्ये कवडू जखमी झाल्याने त्यांना चंद्रपूर येथे उपचाराकरिता पाठवण्यात आले होते उपचार करून आल्यावर त्यांनी दि 28 जुलै ला थेट वणी पोलीस ठाणे गाठले व सतीश विरोधात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी सतीश विरोधात गुन्हा नोंद केला आहे