Home वणी परिसर वणी शहर अध्यक्षपदी मो.असीम हुसैन

वणी शहर अध्यक्षपदी मो.असीम हुसैन

376

AIMIM ने केली निवड

वणी बातमीदार: वणी शहरात संघटनात्मक बांधणी बळकट व्हावी या करिता ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन चे महाराष्ट्र कार्याध्यक्ष डॉ.अब्दुल गफ्फार कादरी आणि मराठवाडा अध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश महासचिव फिरोज लाला यांच्या प्रमुख उपस्थितीत मो.असीम हुसैन यांची वणी शहर अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.

आगामी नगर परिषद निवडणूक पाहता वणी शहरात AIMIM पक्षाची बांधणी योग्यरित्या व्हावी याकरिता पक्षाचे वरिष्ठ नेते सरसावले आहेत. शहरात पक्ष मजबूत व्हावा यासाठी असीम हुसेन यांचेवर शहर अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ते मागील अनेक वर्षांपासून एमआयएम चे सक्रिय सदस्य आहे. त्यांचे कार्य पाहता पक्षांचे अध्यक्ष खा. असदुद्दीन ओवैसी यांच्या आदेशावरून सादर नियुक्ती करण्यात आली आहे