Home क्राईम लग्नाचे आमिष दाखवून विधवेचे शोषण

लग्नाचे आमिष दाखवून विधवेचे शोषण

543

महिला गर्भवती, गुन्हा दाखल

वणी बातमीदार: वणी शहरातील सर्वोदय चौकात वास्तव्यास असलेल्या 38 वर्षीय विधवेला लग्नाचे आमिष दाखवून सतत तीन वर्ष  वेळोवेळी लैंगिक शोषण केले. पीडिता गर्भवती राहिल्यामुळे ‘तो मी नव्हेच’ ची भूमिका घेणाऱ्या 28 वर्षीय युवकांवर वणी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

लक्ष्मण किशोर खेडेकर असे फरार आरोपीचे नाव आहे, तो येथील सर्वोदय चौकात राहतो. त्याच परिसरात विधवा महिला राहत होती. विधवेच्या असाह्यतेचा फायदा घेत त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. मागील तीन वर्षांपासून तिचे वारंवार शोषण केले. यामध्ये महिला 8 महिन्याची गर्भवती राहिल्याने तिने त्याला लग्नाची गळ घातली होती.

लग्ना करिता सतत च्या तगाद्यामुळे लक्ष्मण ने ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका घेऊन लग्नास नकार दिला त्यामुळे पीडितेने  दि. 28 जुलै ला वणी पोलीस स्टेशन गाठले व आपल्यावर सातत्याने झालेल्या अत्याचाराची माहिती पोलिसांना देताच वणी पोलिसांनी आरोपीवर भादवि कलम 376, 417 नुसार गुन्हा नोंद केला आहे. याची भनक आरोपीला लागताच त्याने शहरातून पळ काढला आहे. ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि माया चाटसे पुढील तपास करीत आहे.

Previous articleनैसर्गिक आपत्तीग्रस्त कोकणाला मनसेची मदत
Next articleसंतापजनक.. जन्मदात्रीच झाली विकृत वासनेची ‘शिकार’
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.