Home वणी परिसर भाजपाच्या विध्यमान नगरसेवकाने धरला “हात”

भाजपाच्या विध्यमान नगरसेवकाने धरला “हात”

1094

मंत्री राऊत यांच्या उपस्थितीत काँग्रेस मध्ये प्रवेश

 तुषार अतकारे, वणी: स्थानिक स्वराज संस्थेची निवडणूक जवळ येत असल्याने काँग्रेस पक्ष तयारीला लागल्याचे दिसत आहे. रविवारी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या उपस्थितीत भाजपच्या विध्यमान नगरसेवकाला आपल्या जाळ्यात ओढून काँग्रेस ने भाजपला जोरका झटका दिल्याचे बोलले जात आहे

वणी नगरपालिकेत भाजपची एक हाती सत्ता आहे. आगामी होणाऱ्या नगर पालिकेच्या निवडणुकीत भाजपला शह देण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष मोर्चे बांधणी करतांना दिसत आहे. मागील निवडणुकीत काँग्रेस सोबतच कोणत्याही पक्षाला खाते उघडता आले नव्हते परंतु सध्यस्थितीत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्या मुळे त्या-त्या पक्षातील कार्यकर्ते कामाला लागले आहे. हीच परिस्थिती सम्पूर्ण राज्यात बघायला मिळत आहे.

ऊर्जा मंत्री नितीन राऊत हे दि 1 ऑगस्ट ला वणी येथे आले होते. त्यांनी यावेळी माजी आमदार वामनराव कासावार यांच्या निवासस्थानी पदाधिकारी व कार्यकर्ते यांची आढावा बैठक घेतली. यावेळी खा. बाळू धानोरकर, वामनराव कासावार, ऍड देविदास काळे, टिकाराम कोंगरे व काँग्रेस जेष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रभाग क्र 13 मधील भाजपाचे विध्यमान नगरसेवक संतोष पारखी यांनी 300 कार्यकर्त्या सह कॉग्रेस पक्षात प्रवेश करताच त्यांना वणी विधानसभा युवक काँग्रेस च्या अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यावेळी ओम ठाकूर, इजहार शेख, आशिष खुलसंगे, प्रमोद वासेकर, वंदना आवारी, प्रमोद निकुरे, संध्या बोबडे, वंदना दगडी, मंगला झिलपे, राजू येलटीवार, सुरेश काकडे, रवी देठे उपस्थित होते

Previous articleमारेगावला सोलर प्लान तयार करावा
Next articleसहकार खात्यानेच महाराष्ट्राला तारले
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.