Home वणी परिसर ‘रॉयल फाऊंडेशन’ ला ऑक्सिजन काँसंनट्रेटर भेट

‘रॉयल फाऊंडेशन’ ला ऑक्सिजन काँसंनट्रेटर भेट

164

मनीष चौधरींचे दातृत्व

वणी बातमीदार: शहरात सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात विश्वसनीय कार्य व्हावे याकरिता रॉयल फाऊंडेशन ही संस्था स्थापन करण्यात आली. संस्थेच्या कार्यालयीन फलकाचे उदघाटन शनिवार दि. 31 जुलै ला प्रसिध्द उद्योजक मनीष चौधरी यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी 65 हजार रुपये किंमतीचे ऑक्सिजन काँसंनट्रेटर संस्थेला भेट दिले.

रॉयल फाऊंडेशन या संस्थेकडून अधिकाधिक समाजोपयोगी कार्य होतील अशी अपेक्षा या प्रसंगी मनीष चौधरी यांनी व्यक्त केली. यावेळी ऍड. निलेश चौधरी व  डॉ. रोहित वनकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना समजाप्रती असलेल्या सामाजिक दायीत्व भावनेतून सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याकरिता “रॉयल फाऊंडेशन” ही संस्था सुरू करण्यात येत असल्याचे स्पष्ट करीत संस्थेची लवकरच वणी, पांढरकवडा आणि राळेगाव शहराची कार्यकारिणी घोषित करण्यात येणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी वर्षा राजेश कचवे, निकुंज अटारा, सागर वंजारी, अजय टोंगे, ललित कचवे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.