Home क्राईम घोडदरा शिवारात युवकाची हत्या?

घोडदरा शिवारात युवकाची हत्या?

712

घातपाताचा संशय
बोटोणी : राहुल आत्राम: तालुक्यातील घोडदरा शिवारात असलेल्या शेतात एका 22 वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. शरीराच्या वेगवेगळ्या भागात जखमेचे व्रण असल्याने त्याची हत्या झाली असावी असा कयास व्यक्त केल्या जात आहे.

प्रमोद नामदेव रामपुरे (22) हा अर्जुनी येथील निवासी आहे. घोडदरा शिवारात असलेल्या गजानन धनवे यांच्या शेतात त्या युवकाचा मृतदेह आढळून आल्याने तर्कवितर्कला उधाण आले आहे. नेमका कशामुळे मृत्यू झाला याबाबत साशंकता व्यक्त केल्या जात आहे. दरम्यान निळी जीन्स पॅन्ट, चौखडा शर्ट व बूट परिधान केला आहे. मृतकाची ओळख निष्पन्न करण्यात पोलिसांना यश आले आहे. परिणामी त्याच्या शरीरावर असलेल्या जखमां व परिस्थितीजन्य स्थितीवरून त्याचा खून झाला असावा असा कयास व्यक्त केला जात आहे.

Previous articleत्या..पूरग्रस्त पीडितांना 5 लाखाची मदत करा
Next articleलोक अदालतीत 51 लाखाचा दंड वसूल
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.