Home वणी परिसर बँकेत गेलेला युवक घरी परतलाच नाही

बँकेत गेलेला युवक घरी परतलाच नाही

78

परिवाराची शोधाशोध, पोलिसात तक्रार

वणी बातमीदार: बँकेतील खात्याचे स्टेटमेंट आणण्याकरिता घरून निघालेला 28 वर्षीय युवक घरी परतलाच नाही. त्याचा भ्रमणध्वनी बंद असल्याने परिवाराने शोधाशोध केली आणि अखेर वणी पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली आहे.

प्रीतम जसवंतलाल जैन (28) असे बेपत्ता युवकांचे नावं असून तो शहरातील रवी नगर परिसरात वास्तव्यास आहे. त्याचे 12 वी पर्यंत शिक्षण झाले आहे तो घरी असलेले किराणा दुकान तो सांभाळत होता. दि. 6 ऑगस्ट ला तो बँक खात्याचे स्टेटमेंट काढण्याकरिता एक्विटास बँकेत आपल्या दुचाकी क्रमांक MH – 29 AS- 1590 ने घरून सकाळी 10. 30 वाजताच्या सुमारास गेला होता मात्र बराच वेळ झाल्यावर सुद्धा तो घरी न परतल्याने त्याच्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. पंधरा मिनिटात पोहचतो असे त्याने सांगितले. मात्र काही वेळातच त्याचा भ्रमणध्वनी बंदावस्थेत आढळल्याने पारिवारिक मंडळी काळजीत पडले. नातेवाईक तसेच मित्र मंडळी कडे चौकशी करण्यात आली परन्तु त्याचा ठावठिकाणा लागत नसल्याने अखेर त्याचे वडील जसवंतलाल जैन यांनी वणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे