Home वणी परिसर स्वातंत्रदिना निमित्त ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा

स्वातंत्रदिना निमित्त ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा

134

रोटरी क्लब चे आयोजन 

वणी बातमीदार :-75 व्या स्वातंत्र दिनानाचे औचित्य साधून येथील रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी च्या वतीने ऑनलाईन भाषण व वक्तृत्व स्पर्धे चे आयोजन करण्यात आले आहे

रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी नेहमीच सामाजिक कामात अग्रेसर असते.विद्यार्थ्यांना स्वातंत्र दिनाचे महत्व कळावे या  करिता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा वर्ग 5 वी ते 7 वी ( अ गट),वर्ग 8 वी ते 10 वी ( ब गट ) अश्या दोन गटात घेण्यात येणार आहे. कोरोना च्या निर्बंधामुळे ही स्पर्धा ऑनलाईन घेण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांनी स्वातंत्र दिनावर किंवा भारत स्वातंत्र पूर्व / स्वातंत्र नंतर  या विषयावर तीन मिनिटांचा व्हिडीओ तयार करून रोटरी क्लब चे अध्यक्ष विनोद खुराणा 9822361333, सचिव परेश पटेल 9422169465, निखिल केडीया 9422165890, विनोद बाजोरिया 9422166739, अंकुश जैस्वाल 9423131524, अस्वीन कोंडावार 9923845045, किरण दीकुंडवार 9922570505 या मोबाईल क्रमांका वर दि 15 ऑगस्ट पर्यंत  पाठवावे दोन्ही गटातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख बक्षीस व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.