Home वणी परिसर अन्यथा.. खाण बंद पाडू ….विश्वास नांदेकर

अन्यथा.. खाण बंद पाडू ….विश्वास नांदेकर

864
* एसीसीच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर 

वणी बातमीदार : शासनाच्या नियमाला तिलांजली देत एसीसी गोवारी माईन्स चे अधिकारी अवैध “ब्लास्टिंग” करीत आहे. त्यामुळे लगत असलेल्या गावांना धोका निर्माण झाला आहे. नियमानुसार ब्लास्टिंग करा अन्यथा खाण बंद पाडू असा इशारा माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी कंपनी च्या अधिकाऱ्यांना दिला आहे.

शिंदोला परिसरातील एसीसी गोवारी माईन्स येथे सतत होत असलेल्या ब्लास्टिंग मुळे गोवारी गावातीत शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, गावातील घरांना तडे गेलेले आहेत. त्यामुळे शिवसेना आक्रमक झाली असून दि.10 ऑगस्ट ला माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी परिसरातील सरपंच यांना सोबत घेऊन एसीसी खाणीच्या अधिकाऱ्यासोबत चर्चा केली.

ब्लास्टिंग बाबत शासनाने नियम ठरवून दिले आहेत. ब्लास्टिंग ची काही बंधने कंपनीला आहेत. दुपारी 12.30 ते 1.30 व दुपारी 3.30 ते 4.30 वाजता ब्लास्टिंग च्या वेळा ठरवून दिलेल्या वेळेतच  ब्लास्टिंग करणे बंधनकारक आहे. मात्र अधिकारी मनमानी करीत असल्याचा आरोप  नांदेकर यांनी केला असून अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. कंपनीमुळे परिसरात शेती, पाणी व रस्त्याच्या समस्या निर्माण झाल्या आहे. या बाबत अधिकाऱ्यासोबत चर्चा करण्यात आली. या समस्या तातडीने सोडाव्यात अन्यथा खाण बंद पाडू असा इशारा दिला. यावेळी गोवारीचे सरपंच नरेंद्र बदखल, बोरीचे सरपंच कवरासे, जीवन डवरे, भोरू पोतराजे, सांबशिव मत्ते उपस्थित होते.