वणी बातमीदार :-येथील शि.प्र. मंडळ विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक मधुकर नारायण सरपटवार यांचे गुरुवारी वार्धक्याने दुःखद निधन झाले.
ते पुणे येथे आपले सुविद्य सुपुत्र महेश व उमेश यांच्या जवळ राहत होते. ते ९१ वर्षांचे होते. वणीतील नामवंत कवि नारायण माधव सरपटवार त्यांचे वडील तर प्रख्यात प्राध्यापक मनोहर सरपटवार त्यांचे कनिष्ठ बंधु होते. ते शिक्षण प्रसारक मंडळाचे आजीव सदस्य व विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे.