खालिद पटेल यांच्या प्रयत्नाला यश
मारेगाव: दिपक डोहणे- मारेगाव कोलगाव रस्त्यालगत असलेल्या कब्रस्थान मध्ये जाणाऱ्या मार्गाचे भूमिपूजन शुक्रवारला संपन्न झाले. मागील वर्षभरापासून सातत्याने मागोवा घेणाऱ्या माजी नगरसेवक तथा आरोग्य सभापती खालिद पटेल यांच्या प्रयत्नांची फलश्रुती मानल्या जात आहे.
येथील मुस्लिम समाजातील दफनविधी कार्यक्रम करीता चार एकरात असलेल्या कब्रस्थानात जाण्यासाठी खडतर रस्ता समाजाच्या नशिबी होता. या रस्त्याचे काँक्रीटीकरण होण्यासाठी येथील प्रभाग क्रमांक 13 चे नगरसेवक तथा आरोग्य सभापती खालिद पटेल यांनी मागील एक वर्षांपासून कागदोपत्री सातत्याने मागोवा घेतला. अखेर नागरी सुविधा निधी अंतर्गत या रस्त्याची तब्बल 5 लक्ष रुपयाचा निधी मंजुरात करवून घेतला. सातत्याने केलेल्या प्रयत्नाला वर्षभरानंतर यशाची फलश्रुती लाभली.
शुक्रवारी सदरील रस्त्याचे भूमिपूजन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शरीफ अहेमद, खालिद पटेल, मोहम्मद भाई, रसूल शेख, अँड, महेमुद खान, खलील सिकंदर, अहेफाज, इरफान शेख, वाहिद यांचेसह समाज बांधवांची प्रामुख्याने उपस्थिती होती.