Home वणी परिसर ..त्या राज्यमार्गाचे बांधकाम ‘निकृष्ट’

..त्या राज्यमार्गाचे बांधकाम ‘निकृष्ट’

386

राजकिय पुढारी बनलाय ठेकेदार..!

युवक कांग्रेसचा रास्तारोको 

मुकुटबन बातमीदार: केंद्रीय विकास निधीं अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील मुकुटबन-पाटण- बोरी या 29 किलोमीटर रस्त्यांसाठी 84 कोटीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मागील सहा महिन्यांपासून करण्यात येत आहेत. सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात कंत्राटदारा कडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करीत, झरीजामणी तालुका युवक काँग्रेसच्या वतीने शुक्रवार दि. 13 ऑगस्ट ला पाटण येथील महामार्गावर रास्तारोको करण्यात आला.

मुकुटबन-पाटण-बोरी या 29 किलोमीटर राज्य मार्गाच्या कामात अंदाजपत्रकात नमूद पद्धतीचा अवलंब न करता ठेकेदार स्वतःच्या मर्जीने काम पूर्ण करीत आहेत. मार्गावर येत असलेल्या छोट्या पुलाचे काम अनुभव नसलेल्या राजकीय वर्तुळातील लोकांना दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. परिणामी निकृष्ट बनविण्यात आलेल्या नवनिर्माण पुलावर आताच तडे जात आहेत. तसेच रस्त्यावर मार्गक्रमण करणाऱ्या प्रवाशांच्या व वाहनचालकांच्या जिवाला धोका निर्माण होत आहेत.

रस्त्याचे रुंदीकरण करतांना साइडपट्टी खोदकाम इस्टीमेट नुसार केल्या जात नसल्याचा व मुरुम ऐवजी काळ्या मातीचा वापर केला जात असल्याचा आरोप या रस्ता रोको आंदोलना दरम्यान करण्यात आला. मुकुटबन- पाटण-बोरी या राजमार्ग 315 झरीजामणी तालुक्यातील मुख्य मार्ग आहेत. सदर मार्ग राष्टीय महामार्ग 7 ला जोडला असून रात्र-दिवस जड वाहतूक सतत सुरू असते. सदर मार्गाचे काम इस्टीमेट मध्ये नमूद नियमानुसार व्हावे यासाठी वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता कडे निवेदन देण्यात आले. परंतु संबंधित विभाग रस्त्याच्या कामाकडे डोळेझाक करीत असल्याचा आरोप  यावेळी करण्यात आला.

याप्रसंगी वणी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार वामनराव कासावार, संदीप बुरेवार, निलेश येलट्टीवार, सुनील ढाले, हरिदास गुजलवार, राहुल दांडेकर, प्रकाश कासावार, भूमारेड्डी बाजनलावार, शेखर बोनगीलवार सह युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous article‘त्या ‘ वादग्रस्त टॉवर चे बांधकाम बेकायदेशीर
Next articleयुवकाने घेतली तलावात उड़ी
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.