Home Breaking News चक्क…..ऑटोत व उबंरठयावर काळी बाहुली आणि लिंबू …!

चक्क…..ऑटोत व उबंरठयावर काळी बाहुली आणि लिंबू …!

1428
C1 20240404 14205351

 जादुटोणाची प्रकार, पोलीसात तक्रार

वणीः तालुक्‍यातील राजुर कॉलरी येथे चक्‍क ऑटो मध्‍ये व घराच्‍या उंबरठयावर काळी बाहुली व लिंबू आढळून आल्‍याने त्या परिवारात व परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा जादुटोण्‍याचा प्रकार लक्षात घेता पोलीसांत तक्रार दाखल करण्‍यात आली आहे.

राजुर कॉलरी येथील पीपल दफाई परिसरात वास्‍तव्‍यास असलेला ऑटोरिक्षा चालक नौशाद अहमद हा शुक्रवारी सकाळी 7 वाजता घरासमोर असलेल्‍या ऑटोची सफाई करण्यासाठी गेला. यावेळी ऑटोच्या डॅशबोर्ड वर काळ्या रंगाची बाहुली तसेच एक लिंबू ठेवलेले दिसले. त्‍यांनी इतरत्र शोध घेतला असता घराचे दाराजवळ सुद्धा एक बाहुली ठेवलेली आढळली. याप्रकारामुळे त्‍याचे कुटूंब भयभित झाले आहेत.

अंधश्रध्‍दा संपुष्‍टात यावी याकरीता अंधश्रध्‍दा निर्मुलन समिती मोठया प्रमाणात जनजागरण करताहेत. 21 व्या शतकात प्रवेश करून पदोपदी आपण विज्ञानाचा वापर करीत जीवन कंठीत आहोत. विज्ञाना शिवाय आजच्या युगात एकही पाऊल पुढे टाकणे कठीण आहे. अशातच घडलेल्‍या या प्रकारामुळे दहशत निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न केल्‍या जात आहे.

जादूटोण्याचा प्रयोग करून विरोधकाला नामोहरम करण्याचा हा प्रयत्न असल्‍याचे मत स्‍थानिक व्‍यक्‍त करताहेत. याप्रकरणी नौशाद अहमद यांनी थेट वणी पोलीस स्‍टेशन गाठून रितसर तक्रार केली आहे. तसेच अघोरी व जादूटोण्याचा प्रकार करणाऱ्या अज्ञातावर जादूटोणा विरोधी कायद्यानुसार कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्‍यात आली आहे.
वणीः बातमीदार