Home वणी परिसर अडेगाव येथील नेत्र तपासणीला उत्स्फूर्त प्रतिसाद

अडेगाव येथील नेत्र तपासणीला उत्स्फूर्त प्रतिसाद

189

* 600 जणांची तपासणी

वणी बातमीदार:- मंगेश पाचभाई मित्र परिवाराच्या वतीने अडेगाव येथे मोफत घेण्यात आलेल्या नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराला उत्फुर्त प्रतिसाद मिळाला. या शिबीरात 600 गरजूंनी तपासणी केले असून यातील 100जणांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

अडेगाव येथील दत्त मंदिरात सदर शिबिराचे आयोजन रक्तदूत मंगेश पाचभाई यांच्या पुढाकाराने घेण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक युवराज राठोड, सरपंच सीमा लालसरे, ग्रा.प.सदस्य संतोष पारखी, संजय आत्राम, वंदनाताई पेटकर उपस्थित होते.

सावंगी मेघे येथील तज्ञ डॉक्टरां कडून तपासणी करण्यात आली. या तपासणी दरम्यान शस्त्रक्रिया गरजेची असलेल्या 100 गरजूंवर दि 23 ऑगस्ट ला सावंगी मेघे येथील रुग्णालयात शस्त्रक्रिया केली जाणार आहे. या शिबिरात कोरोना नियमांचे काटेकोर पणे पालन करण्यात आले होते. प्रत्येकाला माक्स चे वाटप यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमाला धनंजय पाचभाई, विजय लालसरे, राहुल ठाकूर , दिगंबर पाचभाई , दत्ताभाऊ लालसरे, विलास देठे, बाल्या पाचभाई, जगदीश चांदेकर, अमोल झाडे, किशोर जगताप , दिनेश जिवतोडे, मारोती पाचभाई, रमेश गावंडे, मारोती गोंडे , गिरिधर राऊत, अनिल आवारी, विजय भोयर, सुनील आवारी, निखिल देठे, राहुल पाचभाई, उपस्थित होते सूत्रसंचालन आशिष राऊत यांनी केले.