Home वणी परिसर माजी नगराध्यक्ष तोटावार यांना हृदयविकाराचा झटका

माजी नगराध्यक्ष तोटावार यांना हृदयविकाराचा झटका

1334
* प्रकृती चिंताजनक
* नागपूर येथे उपचार सुरू 

वणी बातमीदार:- माजी नगराध्यक्ष तथा कोळसा व्यवसाईक सतीश तोटावार यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असून नागपूर येथे त्यांचेवर उपचार सुरू आहे.

सतीश तोटावार हे नेहमी प्रमाणे सकाळी जिम मधून सराव करून घरी आले. त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने ते नागपूर येथील अरनेजा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांची एन्जोग्राफी करण्यात आली मात्र काही वेळातच त्यांना मेंदूचा झटका आल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक झाली. त्यांना पुढील उपचारासाठी न्यु इरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांचेवर उपचार सुरू आहे.

Previous articleपालिका निवडणुकीसाठी ‘वंचित’ सज्ज
Next articleइंदिराग्राम येथे धान्य किटचे वाटप
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.