Home राजकीय मनसेच्या महिला तालुकाध्यक्षपदी आरती राठोड

मनसेच्या महिला तालुकाध्यक्षपदी आरती राठोड

299

मारेगाव: दीपक डोहणे- मारेगाव तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला अध्यक्षपदी आरती संतोष राठोड तर शहर अध्यक्ष म्हणून सिंधू संजय बेसकर यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी निवडीचे नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे सर्वच राजकीय पक्षांना वेध लागले असतांना वेगवेगळ्या व्यूहरचना आखण्याचा व  अनेकांच्या नियुक्त्या करून पक्ष बांधणीवर जोरकसपणे प्रयत्न चालविल्या जात आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तालुक्यासह शहरात मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

पक्षाची मोट बांधण्याचा दृढ दृष्टिकोन ठेवीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला अध्यक्ष पदी भारती संतोष राठोड यांची निवड करण्यात आली. तालुका महिला उपाध्यक्ष म्हणून कुंता अभिमान वाढई यांची तर मारेगाव महिला शहर अध्यक्ष म्हणून सिंधू संजय बेसकर यांचेकडे पदभार सोपविण्यात आला. महिला शहर उपाध्यक्ष म्हणून सविता रमेश कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली.

Previous articleभरधाव दुचाकीस्वाराने वृद्धास उडवीले
Next articleराणेंच्या वक्तव्याचा निषेध
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.