Home वणी परिसर विदर्भ राज्यासाठी ”रस्ता रोको जेल भरो”

विदर्भ राज्यासाठी ”रस्ता रोको जेल भरो”

179
 * 26 ऑगस्ट ला आंदोलन 

वणी बातमीदार:- स्वतंत्र विदर्भ राज्या करिता विदर्भ राज्य आंदोलन समितीने आक्रमक भूमिका घेतली असून दि 26 ऑगस्ट ला वणी येथे ”रस्ता रोको जेल भरो” आंदोलन करणार आहे.

विदर्भ राज्य आंदोलन समिती गेल्या अनेक वर्षापासून वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी करीत आहे. या करिता अनेक आंदोलने या समितीच्या माध्यमातून करण्यात आली आहे. मात्र केंद्र सरकार या कडे दुर्लक्ष करीत असल्याने विदर्भ राज्य आंदोलन समिती आक्रमक झाली आहे.

विदर्भातील 11 ही जिल्ह्यात आणि 120 तालुक्यात 26 ऑगस्ट रोज गुरुवार ला “रस्ता रोको जेल भरो” आंदोलन होणार आहे त्याचाच एक भाग म्हणून वणी येथील यवतमाळ मार्गावर असलेल्या  साई मंदिर समोर सकाळी 11 वाजता “रस्ता रोको जेल भरो” आंदोलन होणार असल्याचा निर्णय आंदोलन समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समितिचे रफिक रंगरेज, देवराव धांडे, राहुल खारकर, राजू पिंपळकर, संजय चिंचोळकर, मंगेश रासेकर, अमित उपाध्ये, सृजन गौरकर, विकेश पानघाटे, प्रमोद खुरसाने इत्यादी उपस्थित होते.

Previous articleपालिकेची शाळा चोरट्यांच्या निशाण्यावर
Next articleबांधकाम विभागाला मनसेचा ‘इशारा’
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.