Home Breaking News शेतातील विज खांबाच्या तंगाव्यात करंट, बैलाचा मृत्यू

शेतातील विज खांबाच्या तंगाव्यात करंट, बैलाचा मृत्यू

366

* वीज वितरणचा निष्काळजीपणा, शेतकऱ्यांचे नुकसान

वणी बातमीदार: तालुक्यातील कुर्ली शेत शिवारात शेतातून वीज वितरणचा वीज पुरवठा होतो. शेतात ठिक ठिकाणी विजेचे खांब आहेत, त्यातील एका खांबाच्या तंगाव्यात वीज प्रवाहित झाली होती. त्याला डवरणी करीत असलेल्या बैलाच्या पायाचा स्पर्श झाला. यावेळी जबर धक्का लागून बैल जागीच ठार झाल्याची घटना दि.28 ऑगस्ट ला घडली.

गौरव नामदेव निब्रड (27) रा. शिंदोला यांच्या आईच्या नावे कुर्ली येथे शेती आहे. त्या शेतातून वीज वितरण कंपनी चे विजेचे खांब गेलेले आहेत. खांब व्यवस्थित राहण्याकरिता तारेचा तंगावा लावलेला असतो. त्या तंगाव्यात वीज प्रवाहित झाली होती. शनिवारी सकाळी तक्रारकर्त्याचा मोठाभाऊ सचिन डवरणी करत होता. तंगाव्याजवळून जात असताना बैलाचा पाय तंगाव्याला लागला त्यात विज प्रवाहित असल्याने बैलाला जबर करंट लागला व बैल जागीच मृत्युमुखी पडला.

घडलेल्या घटने बाबत सचिन याने गौरवला सांगितले. या प्रकरणी शिरपूर पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. ऐन मशागतीच्या काळात बैलाचा मृत्यू झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. परंतू नकळत शेतमजूर किंवा अन्य व्यक्तीचा त्या वीज प्रवाहित तारेला स्पर्श झाला असता तर अघटित घडले असते. या घटनेमुळे वीज वितरण कंपनी चा निष्काळजीपणा पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

Previous articleमामाचा भाचीवर एक वर्षा पासून अत्याचार
Next articleपीओपी मूर्तीं विक्रीवर निर्बंध, होणार कारवाई
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.