रोटरी क्लब चे आयोजन
वणी बातमीदार:-75 व्या स्वातंत्र दिनाचे औचित्य साधून येथील रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी च्या वतीने ऑनलाईन भाषण व वक्तृत्व स्पर्धे चे आयोजन करण्यात आले होते. अ गटात गार्गी भास्कर पिसे तर ब गटात रिद्धी वानखेडे हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी नेहमीच सामाजिक कामात अग्रेसर असते. विद्यार्थ्यांना स्वातंत्र दिनाचे महत्व कळावे या करिता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा वर्ग 5 वी ते 7 वी (अ गट), वर्ग 8 f ते 10 वी ( ब गट) अश्या दोन गटात घेण्यात आली होती. ऑनलाईन घेण्यात आलेल्या स्पर्धेत 60 विध्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
या मध्ये (अ गटात ) गार्गी भास्कर पिसे प्रथम,यशवी बतरा द्वितीय, आर्या डांगे तृतीय, तर ( ब गटात ) रिद्धी वानखडे प्रथम,तेजस्विनी गव्हाणे हिने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. यशस्वी स्पर्धकांना रोख बक्षीस व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.