Home Breaking News उपविभागीय पोलीस अधिकारी पूजलवार यांच्या वाहनाला अपघात

उपविभागीय पोलीस अधिकारी पूजलवार यांच्या वाहनाला अपघात

93

एसडीपीओ सह चालक जखमी 

वणी बातमीदार:- वणी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी  यांच्या शासकीय वाहनाचा राळेगाव जवळ अपघात झाल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूजलवार सह चालक जखमी झाल्याची घटना रात्री 9 वाजताचे सुमारास घडली.

उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूजलवार हे यवतमाळ येथे आस्थापना च्या बैठकीला गेले होते.बैठक आटपून ते आपल्या शासकीय वाहनाने राळेगाव मार्गाने वणी कडे येत असतांना चालक परेश मानकर याचा वाहनवरून ताबा सुटल्याने वाहन पलटी झाले.

या अपघातात उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूजलवार यांच्या हाताला इजा झाली असून चालक परेश मानकर हे गंभीर जखमी झाले आहे.त्यांना उपचारासाठी यवतमाळ येथे हलविण्यात आले आहे.