Home राजकीय चिखलगाव च्या उपसरपंच पदी अनिल ताजने

चिखलगाव च्या उपसरपंच पदी अनिल ताजने

157

* रुपाली कातकडे यांचा पराभव 

वणी :-शहराच्या लगतच असलेल्या चिखलगाव ग्रामपंचायतीच्या रिक्त झालेल्या उपसरपंच पदा करिता झालेल्या पोट निवडणुकीत अनील ताजने यांनी कातकडे यांचा पराभव केला आहे.

तालुक्यातील चिखलगाव ग्रामपंचायत ही राजकीय दृष्टीने अतिशय महत्वाची ग्रामपंचात समजल्या जाते. पंचायत समिती सभापती संजय पिंपळशेंडे व इंदिरा सूत गिरणीचे अध्यक्ष सुनील कातकडे या दोन धुरंदर नेत्याचे गाव आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या कोल डेपो मूळे या ग्रामपंचायतीला विषेश महत्व प्राप्त झाले आहे.

16 सदस्य असलेल्या ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच असलेले अमोल रांगणकर यांचा मृत्यू झाल्याने ही जागा रिक्त होती. त्या जागेच्या पोट निवडणुकी करिता दि 2 सप्टेंबर ला विशेष सभा ग्रामपंचायत कार्यालयात बोलावण्यात आली होती. या सभेला 16 सदस्य पैकी 15 सदस्य उपस्थित होते.

उपसरपंच पदाकरिता अनिल ताजने व रुपाली सुनील कातकडे यांनी नामांकन अर्ज दाखल केले. त्यामुळे मतदानाची प्रक्रिया पार पडावी लागली झालेल्या मतदानात अनिल ताजने यांना 9 मते तर रुपाली कातकडे यांना 6 मते प्राप्त झाल्याने अनिल ताजने यांना निवडणूक निर्णय अधिकारी शेखर आकुलवार यांनी विजयी घोषित केले.