Home वणी परिसर घाणीचे साम्राज्य…सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था

घाणीचे साम्राज्य…सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था

135

* वराहचा मुक्तसंचार, चिखलाचे साम्राज्य, पालिकेचे दुर्लक्ष

वणी- शहरातील एकता नगर परिसरात सर्वसामान्य नागरिक वास्तव्यास आहेत. पालिकेने फार पूर्वी सार्वजनिक शौचालयाची निर्मिती केली होती. त्या शौचालयाची साफ सफाई व स्वच्छतेची जबाबदारी मात्र पालिकेने झिडकारल्याचे दिसत असून सभोवताल साचलेला कचरा, चिखलाचे साम्राज्य, वराहचा मुक्तसंचार, परिसरात पसरलेली प्रचंड दुर्गंधी स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आणणारे ठरणार आहे.

एकता नगर परिसरात कष्टकरी सर्वसामान्य नागरिक राहतात त्यांच्या सोयी सुविधे करिता सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले होते. त्या शौचालयाचा सध्यस्थीतीत अल्प वापर होत आहे. यामुळेच सभोवताल  झाडे, झुडपे उदयास आली आहे. चिखल, दुर्गंधी, अस्वच्छता व वराहचा मुक्तसंचार आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे.

स्थानिक नागरिकांनी पालिकेच्या मुख्यधिकाऱ्यांना निवेदन देत एकता नगर मधील खाती चौक परिसरातील सार्वजनिक शौचालयाची साफ- सफाई, कचरा सफाई तथा फागीन मशीन, किटक नाशक फवारणी त्वरीत करण्यात यावी अशी मागणी केली आहे. पालिकेला सवड कधी मिळणार याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.