Home वणी परिसर रोखठोक दखल..आणि शौचालयाची साफ सफाई ‘युद्धपातळीवर’

रोखठोक दखल..आणि शौचालयाची साफ सफाई ‘युद्धपातळीवर’

108

* बातमी प्रकाशित होताच नगराध्यक्ष सतर्क

वणी- एकता नगर मधील सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था या मथळ्याखाली “रोखठोक” मध्ये शनिवारी सकाळी बातमी प्रकाशित झाली होती. नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी तात्काळ दखल घेत पालिका प्रशासनाला आदेश दिले. आज दिवसभर शौचालय परिसराची युद्धपातळीवर सफाई करण्यात आल्याने स्थानिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

एकता नगर परिसरात कष्टकरी सर्वसामान्य नागरिक राहतात त्यांच्या सोयी सुविधे करिता पालिकेमार्फत सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले होते. त्या शौचालयाचा सध्यस्थीतीत अल्प वापर होत आहे. यामुळेच सभोवताल  झाडे, झुडपे उदयास आली आहे. चिखल, दुर्गंधी, अस्वच्छता व वराहचा मुक्तसंचार आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे. सध्या पावसाळा आहे यामुळे घाणीचे साम्राज्य कमालीचे वाढले होते. सभोवताल साचलेला कचरा, वराहचा मुक्तसंचार व वाढलेली दुर्गंधी यामुळे स्थानिकांनी समस्येचा उहापोह समाज माध्यमातून मुख्याधिकारी यांचेकडे केला होता.

शहरातील कोणत्याही मुलभूत समस्येचे निराकरण तातडीने करण्याचा पायंडा नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी पाडला आहे. पालिकेत भाजपाची एकहाती सत्ता आहे, स्थानिक नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील महत्वपूर्ण समस्या नगराध्यक्ष यांच्या निदर्शनास आणल्यास विरोधकांना राजकारण करण्याची संधी मिळणार नाही.