Home वणी परिसर जनता विद्यालयात शिक्षक दिन साजरा

जनता विद्यालयात शिक्षक दिन साजरा

125

* ज्येष्ठ शिक्षकांचा गौरव

वणी- डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा  करण्यात येतो. येथील जनता विद्यालयात रविवार दि. 5 सप्टेंबर ला आयोजित कार्यक्रमात शिक्षक दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी ज्येष्ठ शिक्षक मंगला जोगी व विवेकानंद मांडवकर या दोन शिक्षकांच्या गौरव करण्यात आला.

आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक गणेश खंडाळकर यांची उपस्थिती होती. प्रमुख अतिथी म्हणून उप मुख्याध्यापिका वैशाली पेटकर, विनायक आसुटकर, जयप्रकाश गोरे हे होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन चारित्र्यावर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकांचे स्थान काय? आज ऑनलाईन शिक्षण प्रणालीचा स्वीकार करून विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडविणे अश्या अनेक मुद्यावर विचार व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन गजेंद्र काकडे तर आभार प्रदर्शन राजेन्द्र ढोके यांनी केले. या कार्यक्रमाला सर्व शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले .