● 4 संशयित ताब्यात, गुन्हा नोंद
● रोखठोक चे भाकीत खरे
वणी: “रोखठोक” मध्ये बुधवारी रासा येथील निलेशची आत्महत्या की घातपात संभ्रम कायम या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. पोलीस हत्येच्या दिशेने तपास करत असताना अनैतिक संबंधातून निलेशची “हत्या” झाल्याचे सत्य उघड झाले आहे.
चंद्रशेखर दुर्गे (33), आशिष पिदूरकर (22), योगेश उघडे (20), गौरव दोरखंडे (24) सर्व राहणार रासा असे आरोपींची नावे आहेत. चंद्रशेखर दुर्गे याचे मृतकाच्या पत्नी सोबत अनैतिक संबंध होते. संबंधात तिचा पती अडसर ठरत असल्याने त्याने थंड डोक्याने मृतक निलेश चा काटा काढण्याचे कट कारस्थान रचले. घटनेच्या दिवशी मृतकाला रासा गावाच्या फुलोरा जंगलात नेण्यात आले. आणि त्या चौघांनी त्याचा करकचून गळा आवळला. लगतच असलेल्या झाडाला गळफास घेतल्याचा बनाव रचला. या प्रकरणात चार आरोपी सोबतच एका विधी संघर्ष बालकाचा समावेश असल्याचे बोलल्या जात आहे.
तालुक्यातील रासा येथे वास्तव्यास असलेल्या निलेश सुधाकर चौधरी या 30 वर्षीय युवकाचा परिसरातील तलावाजवळ 29 ऑगस्ट ला गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. त्याचे शरीरावर जखमांचे व्रण असल्याने आत्महत्या की घातपात असा संभ्रम निर्माण झाला होता. तपास अधिकारी आनंद पिंगळे यांनी हत्येच्या दिशेने तपासाची व्युव्हरचना आखली. 30 ते 40 जणांची चौकशी करण्यात आली. तांत्रिकदृष्ट्या तपासाची गती वाढवण्यात आल्यानंतर एक-एक कडी जोडत आरोपी पर्यंत पोहचण्यात यश आले आहे.
नव्यानेच रुजू झालेले ठाणेदार शाम सोनटक्के यांनी तपास अधिकारी पिंगळे यांना अनेक बाबीवर मार्गदर्शन केले. तांत्रिक बाबी सोबतच योग्य दिशा निर्देश करत आरोपी पर्यंत पोहचण्यात यश मिळवले असून आरोपीवर हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, उप. वि. पो.अ. संजय पुजलवार यांचे मार्गदर्शनात पो नि श्याम सोनटक्के, सपोनि आनंद पिंगळे, पोहवा सुदर्शन वानोळे, सुनिल खंडागळे, हरीन्द्रकुमार भारती, पंकज उंबरकर, दिपक वाइसवार, मो वसीम, विशाल गेडाम, यांनी केली.