●पुनवट शिवारातील घटना
वणी :- दारू चा वाहतूक परवाना असलेले वाहनाच्या चालकाचा वाहना वरून ताबा सुटल्याने पुनवट शिवारात दि 17 सप्टेंबर वाहन पलटी झाले यामध्ये चालक जखमी झाला आहे.
वणी येथील श्री ट्रेडर्स मधून एम एच 33 टी 0129 हे बोलेरो वाहन 750 एम एल च्या 50 पेट्या,180 एम एल च्या 40 पेट्या व 90 एम एल च्या 250 अश्या 340 पेट्या दारू परवाना काढून वाहतूक करण्याकरिता गाडीत भरला होता.
सदर दारू भंगाराम तळोडी येथील बोडलावार देशी दारु दुकान यांच्या कडे घेऊन जात असतांना पुनवट गावाजवळील वळणावर चालकाचा वाहना वरून ताबा सुटल्याने वाहन पलटी झाले.या मध्ये चालक किरकोळ जखमी झाला आहे.