Home वणी परिसर भारत बंद आंदोलनात सहभागी व्हा

भारत बंद आंदोलनात सहभागी व्हा

377

संयुक्त किसान मोर्चाचे आवाहन

27 सप्टेंबरला ‘भारत बंद’ ची हाक

वणी: संयुक्त किसान मोर्चाने आपल्या राष्ट्रीय संमेलनात, मोदी सरकारच्या जनविरोधी, कॉर्पोरेटधार्जिण्या व भारतीय संविधानिक मूल्यांशी विसंगत असलेल्या धोरणांविरुद्ध 27 सप्टेंबरला ‘भारत बंद’ ची हाक दिली आहे. या भारत बंद च्या आंदोलनात सर्वांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन संयुक्त किसान मोर्चात सहभागी असलेल्या राजकीय,सामाजिक संघटनांनी केले आहे.

मोदी सरकारने शेतकरी विरोधी धोरणे लादून हुकूमशाही सुरू केली आहे. केंद्र सरकारच्या जनविरोधी, कार्पोरेट धार्जिन व भारतीय संविधानिक मूल्यांशी विसंगत असलेल्या धोरणाविरुद्ध 5 सप्टेंबरला उत्तर प्रदेशात मुझफ्फरनगर मध्ये झालेल्या अभूतपूर्व किसान मजदूर महापंचायतीने या हाकेस बुलंद समर्थन दिले आहे.

देशभरातील संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगार, कर्मचारी, शेतमजूर, महिला, युवा, विद्यार्थी व इतर संघटनांनी या ‘भारत बंद’ ला सक्रिय पाठिंबा जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात हा ‘भारत बंद’ प्रचंड प्रमाणात यशस्वी करण्यासाठी भाजपच्या विरोधात असलेले सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, शेतकरी, शेतमजूर, संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगार, कर्मचारी, महिला, युवा, विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक इत्यादी घटकांच्या संघटना तसेच विविध क्षेत्रांतील जनतेनी 27 सप्टेंबर ला वणीत होणाऱ्या भारत बंद आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन संयुक्त किसान मोर्चा मध्ये सहभागी असलेल्या राजकीय , सामाजिक संघटना आदींनी केले आहे.