Home वणी परिसर सतत पडणाऱ्या पावसाने कपासी व सोयाबीन पिक ‘धोक्यात’

सतत पडणाऱ्या पावसाने कपासी व सोयाबीन पिक ‘धोक्यात’

207

हातात आलेले पिक उध्वस्त

शासनाकडून आर्थिक मदतीची हाक

मुकुटबन:- झरीजामणी तालुक्यात मागील काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी वर्गांचे हातात आलेले कपासी व सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले आहेत. परिणामी शेतकरी आणखी आर्थिक संकटात सापडला असून शासनाकडे मदतीची हाक देत आहे.

तालुक्यात सततच्या अतिवृष्टीमुळे शेतकरी वर्गाचे शेतातील हातात आलेले कपासी पिकांचे बोड,पाती आणि फुल गळून पडू लागले आहेत. तर सोयाबीन पिकांचे पाने पिवळे व शेंगा काळ्या पडून पिके जमीनदोस्त होत आहेत. यात शेतकरी वर्गाची मोठे आर्थिक नुकसान होत आहेत. हातात आलेले पीक पावसाने हिरावून घेत असल्याने शेतकरी पुन्हा अस्मानी संकटात सापडला आहेत. परिणामी उत्पादनात मोठी घट होऊन शेतकरीवर्ग आणखी कर्जाच्या डोंगरात जाण्याच्या मार्गावर सापडला आहे.

कापसी, सोयाबीन आणि तूर पिकं जोमात असतांना, अचानक पावसाने लावलेल्या हजेरीमुळे ती जमीनदोस्त होऊन उत्पादनं मोठी घट होण्याची भीती वर्तविली जात आहे. नदी,नाले परिसरातील शेती पाण्याखाली आल्याने पिकांचे प्रचंड नुकसान होत आहेत. दरम्यान शेतकरी वर्ग पुन्हा कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर सापडला आहे. शासनाने कापसी, सोयाबीन आणि तूर पिकांवचे नुकसानभरपाई देण्याची तालुक्यातील शेतकरीवर्ग करीत आहे.