● पुन्हा 200 कार्यकर्त्यांचा प्रवेश
● गोकुळ नगरात सोहळा संपन्न
वणी: नुकताच पक्ष प्रवेशाचा दणदणीत सोहळा काँग्रेस पक्षाने साजरा केला होता. भाजप नगरसेवकाच्या प्रभागात खिंडार पडले होते त्याला काही दिवस होत नाही तेच गोकुळ नगर मध्ये अन्य राजकीय पक्षातील तब्बल 200 कार्यकर्त्यांनी काँग्रेस चा “हात” मजबूत करण्याचा निर्णय घेत माजी आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्वात मंगळवार दि. 29 सप्टेंबरला रीतसर प्रवेश केला आहे.
वणीत काँग्रेस पक्षाने ‘कात’ टाकल्याचे दिसत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना संपूर्ण ताकदीनिशी रणांगणात उतरण्याचा निर्णय स्थनिक पक्ष श्रेष्टींनी घेतल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे. आपला जनाधार किती हे अशाच निवडणुकातून तपासण्यात येतो.स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकी कडे कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून बघितल्या जाते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तिकीट मिळविण्यासाठी ठराविक पक्षातील कार्यकर्त्यांमध्येच आपापसात रस्सीखेच बघायला मिळते. त्यामुळे कोणाला उमेदवारी द्यायची याचा पेच पक्षातील नेत्यासमोर निर्माण होतो. त्यातच नव्याने पक्षात प्रवेश करणाऱ्यांचे बस्तान बसविण्याची जबाबदारी स्थानिक नेत्यावर येते.
येणाऱ्या निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी लढण्याचा निर्धार काँग्रेस पक्षाने केल्याचे पक्ष प्रवेश सोहळ्यातून दिसत आहे. या पूर्वी भाजपचा एक नगरसेवक गळाला लावला तर भाजपा नगरसेवकाच्या प्रभाग क्र 5 मध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश घेऊन एक प्रकारे भाजपाला आवाहन दिले होते.
दि 26 सप्टेंबर ला भाजपाच्या ताब्यात असलेल्या गोकुल नगर मध्ये काँग्रेस ने पक्ष प्रवेश सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्याला माजी आमदार वामनराव कासावार, डॉ मोरेश्वर पावडे, प्रमोद वासेकर, इजहार शेख, ओम ठाकूर, प्रमोद निकुरे, संध्या बोबडे, मंगला झिलपे यांच्या उपस्थितीत 200 कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी 7 ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या फलकाचे अनावर करण्यात आले. तसेच याच परिसरातील 4 वर्षीय बालकाचा पाणी भरलेल्या खड्ड्यात पडून मृत्यू झाला होता त्या बालकाचा परिवाराला 10 हजार रुपयांची मदत करण्यात आली. यावेळी गोकुल नगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. काँग्रेस ने दुसऱ्यांदा भाजपाच्या गडात पक्ष प्रवेश घेऊन भाजपा समोर आवाहन उभे केले आहे.