● आयपीएल सामने जुगाराचा मुख्य स्रोत
वणी: शहरात आयपीएल क्रिकेट सामन्यावर जुगार खेळल्या जातोय हा पूर्वापार इतिहास आहे. अनेक सटोडीयानी यातून माघार घेतली आहे. आता नव्याने उभरते ‘सितारे’ पोलीस करवाईतून दिसत आहे. एसडीपीओ व वणी पोलिसांच्या संयुक्त पथकाने बुधवारी रात्री 8.30 वाजता धाड टाकून दोन सटोडीयाना ताब्यात घेत मुद्देमाल जप्त केला आहे.
विराज उर्फ विरु पंजाब बदकी (24) रा. माहेर कापड केंद्र परिसर व दिनेश तुळशीराम नागतुरे (35) रा. भोईपुरा असे अटकेतील आरोपींची नावे आहेत. आयपीएल च्या क्रिकेट सामन्यावर क्षणाक्षणाला सट्टा लावल्या जातो. सटोडीये मोबाईल वरून लागवड करतात यात लाखो रुपयांची उलाढाल होत असते. क्रिकेटचा ज्वर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तरुणाई झटपट पैसे कामविण्याच्या नादात सट्टा जुगाराकडे वळताना दिसत आहे.
शहरातील मंगलम पार्क परिसरातील आर.के. अपार्टमेंट 2 मधील सदनिका 303 मध्ये रॉयल चायलेंजर बंगलोर व रॉयल राजस्थान या दोन सामन्यावर प्रति ओव्हर तसेच प्रत्येक क्षणाला सट्टा खेळल्या जात होता.या बाबत उप विभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांना प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे त्या सदनिकेवर पोलीस पथकांनी धाड टाकली. यावेळी क्रिकेट सामन्यावर बेटिंग करीत असल्याचे निदर्शनास आले.

आयपीएल सट्टा अड्डयावर एसडीपीओच्या पथकाने व वणी पोलिसांनी संयुक्त रित्या कारवाई केली असून यावेळी तीन लॅपटॉप, तीन मोबाईल संच जप्त करत आरोपीना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांचेवर कारवाईची प्रक्रिया सुरू असून पुढील तपासात ते नेमके कुठे “उतारवाडी” करत होते हे निष्पन्न होणार आहे.
सदर कारवाई पोलीस अधिक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधिक्षक डॉ. खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, सपोनि आनंद पिंगळे, पीएसआय अरुण नाकतोडे, इकबाल शेख, विजय वानखेडे, रवी इसनकर, प्रदीप ठाकरे, संतोष कालवेलकर यांनी केली.