● आरोपीला ठोकल्या बेड्या
वणी:- दोघांची मैत्री होती घरी येणे जाणे होते. त्याने तिला घरी बोलावले व घरी कुणी नसतांना बळजबरीने अत्याचार केल्याची तक्रार वणी पोलिसात दाखल झाल्याने 20 वर्षीय मजनूला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.
अल्पवयीन मुलगी चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील शाळेत इय्यता 10 वित शिक्षण घेत आहे. शाळा बंद असल्याने ती वणी येथील जिल्हा परिषद कॉलनीत असलेल्या आपली घरी आली होती. शहरातील गुरूनगर येथे वास्तव्यास असलेल्या विक्की किशोर पटूना (20) याची पीडिताच्या परिवाराशी ओळखी होती.
घरी येणे जाणे असल्याने अल्पवयीन मुलगी व आरोपी विक्की यांची मैत्री झाली. दि 5 ऑगस्ट ला विक्कीने या अल्पवयीन बलिकेला गुरूनगर येथे असलेल्या आपल्या घरी बोलावले होते. दुपारी 1 वाजताचे सुमारास बालिका त्याच्या घरी गेली असता विक्कीने तिला पकडले तू मला खूप आवडते असे म्हणून बळजबरीने अत्याचार केला.
घाबरलेल्या बलिकेने घडलेली घटना कुणालाही सांगितली नाही. काही दिवसांनी तिच्या पोटात दुखत असल्याने तिने घडलेली घटना आपल्या आई वडिलांना सांगितली. पीडिताच्या परिवाराने कोणताही विलंब न करता वणी पोलीस स्टेशन गाठले व तक्रार दाखल केली असता पोलिसांनी विक्की ला अटक केली आहे.