●सरपंच संघटनेची मागणी
●शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख अनुदान द्या
मारेगाव:- तालुक्यात मागील काही दिवसांपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबीन पीक संकटात सापडले आहे तर कपाशी पिकाची बोंडे काळवंडली असून पिकाचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्यांना हेक्टरी एक लाख रुपये अनुदान देण्याची मागणी करण्यात आली.
गतवर्षीप्रमाणे यंदाही सोयाबीन काढणीच्या हंगामात अतिवृष्टीने धुमाकूळ घातला आहे. पंधरा दिवसापासून पडत असलेला पाऊस थांबला नसून अजूनही पावसाचा जोर कायम आहे. परिणामी शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. काढणीला आलेल्या सोयाबीन ला कोबे फुटत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होत आहे।कपाशी पिकाला लगडलेली बोंडे पूर्णता काळवंडली आहे. कपाशी पिकाला सतत पाण्याचा मारा बसल्यामुळे लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कोडी निर्माण झाली. त्यामुळे तालुक्याला ओला दुष्काळ घोषित करून शेतकऱ्यांना प्रति हेक्टर एक लाख रुपये अनुदान द्यावे अशा आशयाचे निवेदन मारेगाव तालुका सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष अविनाश लांबट, यादवराव पांडे प्रवीण आणि पांडुरंग ननावरे, शारदा गोहोकर, प्रेमीला आदेवार, नीलिमा थेरे, दिलीप आत्राम, चंद्रकांत दुबे, सुजित डुकरे, मारुती तुरांकर, सुरज घाडगे सह आदीनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे