Home Breaking News रेतीची चोरटी वाहतूक आणि पोलिसांची कारवाई

रेतीची चोरटी वाहतूक आणि पोलिसांची कारवाई

661

6 लाखाचा मुद्देमाल ताब्यात, गुन्हा नोंद

परिसरात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून रेती तस्कर बिनधास्तपणे रेतीची चोरटी वाहतूक करताहेत. याबाबत महसूल विभागाचे होत असलेले दुर्लक्ष कारणीभूत आहे. पोलीस प्रशासन कारवाईचा बडगा उगारत असले तरी महसूल विभागाची चुप्पी विविध प्रश्न उपस्थित करताहेत.

पोलीस ठाण्यात आपले कर्तव्य बजावत असलेल्या जमदाराला साखरा शेत शिवारातील नाल्यातून रेतीची चोरटी वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती 30 सप्टेंबर ला मिळाली. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत सापळा रचला.

साखरा पोडाकडे जाणा-या मार्गावर रामचंद्र टिकले व वसंता सोनुले याचे शेताच्या मधुन जाणा-या नाल्यातुन ट्रॅक्टरमध्ये रेती भरून वाहतुक करीत असलेला बिना पासींगचा ट्रॅक्टर व ट्रॉली क्र-MH-29-AK-15653 निदर्शनास आला. यावेळी ट्रॅक्टर चालक गणेश सोमा कुडमेथे (26) रा. साखरा याला अवैद्य वाहतूक होत असलेल्या रेती बाबत पोलिसांनी विचारणा केली असता त्याने ट्रॅक्टर मालक राहुल मोरेश्वर चिडे (30)  रा-साखरा यांची असल्याचे सांगितले.

झरी जामनी तालुक्यातील मुकूटबन पोलीस ठाण्यात कार्यरत जमादार अशोक नैताम यांनी प्राप्त माहितीच्या आधारे अवैद्य रेतीची वाहतूक करणाऱ्यांना जेरबंद केले. याप्रकरणी आरोपीवर भादवि कलम  379, 188, 34 भादवि सहकलम -48 म.ज.म.का. सहकलम-15 पर्यावरण (संरक्षण) अधिनियम व तसेच सहकलम 39/192(2), 130(1)/177, 130(3)/177 मोवाका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महसूल विभागाने गौण खनिजची चोरी, तस्करी व अनधिकृत होणारी वाहतूक याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असताना गावातील तलाठी ते तालुक्याचे तहसीलदार नेमके करतात काय हा संशोधनाचा विषय आहे. या प्रकरणी पुढील तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अनिल सकवान व संजय खांडेकर करीत आहे.

(मुकूबन प्रतिनिधी)

 

 

Previous articleमारेगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करा
Next articleऑनलाईन पिक पाहणी कशी करावी..!
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.