● सटोडीये घेताहेत खेड्यांचा आसरा
सध्या दुबईत IPL चे क्रिकेट सामने सुरू आहेत. मात्र त्याची धूम सट्टयाच्या माध्यमातून ग्रामीण भागापर्यंत पोहचली असून एका खेड्यातुन सुरू असलेला IPL सट्टा पोलिसांनी उधळून लावत एका बुकी ला ताब्यात घेतले आहे.
क्रिकेट चा ज्वर संपूर्ण देशात प्रचंड वाढला आहे. IPL चे सामने म्हणजे अनेकांना भुरळ पाडणारे आहे. IPL च्या क्रिकेट सामन्यावर क्षणाक्षणाला सट्टा लावल्या जातो. सटोडीये मोबाईल वरून लागवड करतात यात लाखो रुपयांची उलाढाल होत असते. अनेक युवक सट्याच्या माध्यमातून झटपट पैसे कामविण्याच्या नादात देशोधडीला लागल्याचे वास्तव नाकारता येत नाही.
IPL चे सामने सुरू होताच पोलिसांनी यावर विशेष लक्ष केंद्रित केले. सायबर सेल व गोपनीय माहितीवरून आत्तापर्यंत दोन ठिकाणी पोलिसांनी IPL सट्टयावर धाडी टाकून बुकींना जेरबंद केले आहे. पोलीस आपल्या पर्यंत पोहचू नये व मोबाईल लोकेशन मिळू नये म्हणून ग्रामीण भागाचा आसरा घेतल्याचे कारवाई वरून सिद्ध होत आहे.
वणी तालुक्यातील नायगाव(खुर्द) या गावात IPL सट्टा सुरू असल्याची गोपनीय माहिती ठाणेदार शाम सोनटक्के यांना मिळाली. डीबी पथक प्रमुख सपोनि आनंद पिंगळे व त्यांच्या पथकाने नायगाव येथे शनिवार दि. 2 ऑक्टोबर ला रात्री 11 वाजताच्या सुमारास सतीश रघुराम मेहतो(40) यांच्या घरी धाड टाकून ताब्यात घेतले. यावेळी त्याचे जवळून 60 हजार 850 रुपये रोख, 44 हजार रुपये किमतीचे 3 मोबाईल व इतर साहित्य असा एकूण 1 लाख 5 हजार 960 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
वणी: बातमीदार