Home वणी परिसर “शुभम” ची नवोदय विद्यालया करिता निवड

“शुभम” ची नवोदय विद्यालया करिता निवड

142

दुर्गापूर जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी

तालुक्यातील अतिदुर्गम व आदिवासी बहुल दुर्गापूर जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या शुभम ने यशाची पहिली पायरी गाठली. जिद्द व चिकाटीच्या जोरावर त्याने यश संपादन केले आहे.

झरी तालुक्यातील दुर्गापूर हे अति दुर्गम भागातील लहानसे गाव आहे. येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणारा शुभम बंडू टेकाम हा लगतच असलेल्या मुच्छी या गावातील रहिवाशी आहे. गरिबी पाचवीला पुजलेली, शिक्षण कसं घ्यावं या विवंचनेत असलेले त्याचे पालक.

आदिवासी कुटुंबात जन्मलेला शुभम हुशार तर आहेच परंतू  जिद्द आणि चिकाटी त्याच्यात ठासून भरलेली आहे. यामुळेच त्याची नवोदय विद्यालया करिता निवड झाली. याचे श्रेय तो मुख्याध्यापक धिरज यादव सहायक शिक्षक पुंडलिक चौधरी व आई वडिलांना देत आहे.

झरी: बातमीदार