Home वणी परिसर वणीत क्रिडाईतर्फे मार्गदर्शन शिबिर

वणीत क्रिडाईतर्फे मार्गदर्शन शिबिर

126

येथील क्रिडाई (वणी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स असोसिएशन)तर्फे स्थानिक वसंत जिनिंग सभागृहात मंगळवारी (दि. ५) मार्गदर्शन शिबिर पार पडले.

या शिबिरात मार्गदर्शक म्हणून सीए वरूण विजयवर्गी (नागपूर), सीए अमित अग्रवाल, सीए पवन खाबिया व सीए नीलेश कटारिया उपस्थित होते. यावेळी या मान्यवरांनी बांधकाम व्यावसायिकांना मार्गदर्शन केले.

शिबिराला ‘क्रिडाई’ वणीचे अध्यक्ष किरण दिकुंडवार, सचिव संजय निमकर, उपाध्यक्ष विवेक ताटेवार, कोषाध्यक्ष मनीष चौधरी, राजेश झिलपीलवार, संजय कोडगीरवार, राम पोदूतवार, मनीष कोंडावार, अनिल उत्तरवार, केतन गुंडावार, अभिनव भास्करवार, अचल जोबनपुत्रा, अतुल जयस्वाल, दामोधर देठे, संदीप जयस्वाल, श्रीकांत गारघाटे, देवराव भगत, हितेन अटारा, मनोज ढुमे, राजाभाऊ गौरकार, सलीम शेख, संजय पोटदुखे, सुधीर गाडगे, सुहास गटलवार, सुनील कातकडे, विवेक पांडे, पप्पू जैन, मनीष चौधरी, क्रिडाई चंद्रपूरचे पदाधिकारी उपस्थित होते. सुहास गटलवार यांनी प्रास्ताविक केले.  किरण दिकुंडवार यांनी संचालन केले.

वणी-प्रतिनिधी