Home वणी परिसर जैताई देवस्थानात श्रीदेवी स्तोत्राचे पठण

जैताई देवस्थानात श्रीदेवी स्तोत्राचे पठण

208

श्री जैताई मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवात अष्टमीच्या पावन पर्वावर श्री जगदंबा स्तोत्राचे पठण आयोजित करण्यात आले होते. मित्र मंडळाच्या वतीने प्रतिवर्षी वेगवेगळ्या स्तोत्राचे सामूहिक पठण सादर केले जाते.

यावर्षी कृष्ण केशव विरचित “सुंदरे गुणमंदिरे करुणाकरे कमलोद्भवले” या स्तोत्राचे प्रणिता पुंड, अरुणा उत्तरवार, अर्चना उपाध्ये, वृषाली देशमुख, कल्पना कोंडावार आणि माया पिदुरकर यांनी सादरीकरण केले.

भारती सरपटवार यांच्या मार्गदर्शनात सादर झालेल्या या गायन सेवेत पेटीवर दादाराव नागपुरे तर तबल्यावर नामदेवराव ससाने यांनी साथ संगत केली. यावेळी सुधीर दामले आणि डॉ. अभिजित अणे यांच्या सौजन्याने छापलेल्या सुंदर स्तोत्राचे सर्व उपस्थितांना आणि मंदिरात येणाऱ्या भाविकांना वाटप करण्यात आले. शेवटी डॉ. अभिजित अणे यांनी सहभागी सर्वांचे आभार प्रदर्शन केले.

वणी: बातमीदार