Home Breaking News जनतेचे कैवारी बनले प्रसुतीसाठी आलेल्या मातेचे वैरी

जनतेचे कैवारी बनले प्रसुतीसाठी आलेल्या मातेचे वैरी

645

त्या… नित्कृष्ठ जेवणाची होणार चौकशी

ग्रामीण रुग्णालयात प्रसूती करिता भरती झालेल्या महिलांना नित्कृष्ठ जेवण मिळत असल्याची तक्रार शिवसेनेने केली होती. याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी ही मागणी जोर धरत असतांनाच या जेवणाच्या चौकशी करिता चार जणांची समिती गठीत करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाने रुग्णालयात प्रसूती करिता भरती होणाऱ्या माता भगिनींना सकस आहार मिळावा या करिता नियमावली तयार केली आहे. दररोज कोणता आहार द्यायचा याचा तक्ता तयार करण्यात आला आहे. या नुसारच प्रसूती करिता आलेल्या महिलांना चांगले जेवण देणे गरजेचे आहे मात्र वणी ग्रामीण रुग्णालयात नित्कृष्ठ दर्जाचे जेवण मिळत असल्याचा भांडाफोड शिवसैनिकांनी केला आहे.

येथील वणी ग्रामीण रुग्णालयात सकस आहार मिळत नसल्याची माहिती शिवसेना उपजिल्ह्या प्रमुख शरद ठाकरे व युवासेनेचे विक्रांत चचडा यांना मिळाली होती. त्यावरून त्यांनी ग्रामीण रुग्णालयातील जेवणाची तपासणी केली. प्रसूती करिता भरती असलेल्या महिलांना विचारणा केली असता नियमानुसार सकस आहार मिळत नसल्याचे महिलांनी सांगितले होते.

रुग्णालयात जेवण पुरविण्याचा कंत्राट नाशिक येथील एका संस्थेला देण्यात आला आहे. या संस्थेने जनतेचा कैवारी असल्याचा देखावा करणाऱ्या एका राजकीय पदाधिकाऱ्याला हा ठेका दिला असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली आहे. या नित्कृष्ठ जेवणाची चौकशी आता करण्यात येणार आहे. त्याकरिता ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी धर्मेंद्र सुलभेवार यांनी चार जणांची समिती गठीत केली आहे.

जिल्ह्या शल्य चिकित्सकाच्या भूमिके कडे लक्ष 
यवतमाळ जिल्ह्याच्या शल्य चिकित्सक ह्या महिला आहे. त्यामुळे त्यांना महिलांच्या समस्यांची चांगलीच जाण आहे. प्रसूती करिता भरती झालेल्या महिलांच्या आहारात दिल्या जाणाऱ्या अनियमितते बाबत आता ‘त्या’ कंत्राटदारावर काय कार्यवाही करणार याकडे वणीकरांचे लक्ष लागले आहे

या समिती मध्ये वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, चतुर्थ श्रेणी कर्मचारी व एका सामाजिक संस्थेचा पदाधिकारी असणार आहे. या समितीच्या माध्यमातून तक्रार करण्यात आलेल्या जेवणाचा अहवाल तयार होणार असून समाजविघातकांचा भांडाफोड होणार असल्याने सर्वांच्या नजरा या अहवालाकडे लागल्या आहेत.

वणी: तुषार अतकारे