Home वणी परिसर शिरपूर ठाण्यात कायदेविषयक मार्गदर्शन

शिरपूर ठाण्यात कायदेविषयक मार्गदर्शन

92

पोलीस स्टेशन शिरपूर येथील दक्षता हॉलमध्ये शुक्रवार दि. 22 ऑक्टोबरला सकाळी कायदेविषयक विविध विषयावर मुख्य न्यायदंडाधिकारी कैलास चापले, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बोमीडवार, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बछले यांनी विस्तृत मार्गदर्शन केले.

शिरपूर येथील दक्षता हॉलमध्ये सकाळी 9:30 ते 10:20 पर्यंत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस पाटील व पोलीस अधिकारी तसेच पोलीस अंमलदार उपस्थित होते.

न्यायाधीश चापले यांनी तालुका विधी सेवा समिती व कार्यकारणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करून सामान्य जनतेपर्यंत कायदा व त्या विषयावरील सहाय्य याबाबत मार्गदर्शन केले. व यापुढे सुद्धा या उपक्रमाचे आणखी व्यापक स्वरूपात जनजागृती करून सामान्य जनता, पीडित व दुर्बल नागरिकांना मोफत विधी सेवेचा फायदा होईल याबाबत आशा व्यक्त केली

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांचे अंतर्गत मोफत विधी सेवा उपलब्ध होण्याचे ठिकाणे बाबतचे शिरपूर पोलीस स्टेशन येथे लावण्यात आलेले भिंती फलकचे अनावरण याप्रसंगी मान्यवरांनी केले. सदर कार्यक्रमास पोलीस स्टेशन शिरपूर अंतर्गत सर्व गावचे पोलीस पाटील व पोलीस अमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वणी: बातमीदार

Previous articleमटका अडयावर एलसीबी व सायबर सेलची ‘धाड’
Next articleराजूर ग्रा.पं.च्या मासिक सभेला सदस्यांची दांडी
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.