Home Breaking News बापरे…तालुक्यात पुन्हा एकदा वाघाची ‘दहशत’

बापरे…तालुक्यात पुन्हा एकदा वाघाची ‘दहशत’

694

गोडगाव शिवारात गायीवर हल्ला

तालुक्यात वाघाचा मुक्तसंचार दहशतीचे वातावरण निर्माण करत आहे. शेतकरी, शेतमजूर भयभीत झाले आहेत. सोमवार दि.25 ऑक्टोबरला गोडगाव शिवारात वाघाने गायीवर हल्ला चढवल्याची घटना घडल्याने चांगलीच खळबळ माजली आहे.

गोडगाव येथील संजय रामकृष्ण दोरखंडे यांची जनावरे चराई करिता घटनेच्या दिवशी जंगल शिवारात गेली होती. अचानक वाघाने गायीवर झडप घातली, यात ती मोठया प्रमाणात जखमी झाली आहे. शरीरावर ओरबडल्याने रक्तस्त्राव सुद्धा चांगलाच झाला आहे.

काही दिवसांपूर्वी तालुक्यातील नवरगाव येथील शेतकऱ्याची कालवड वाघाने ठार केली होती. तर मारेगाव (कोरंबी) शिवारात तरुणाला वाघाचे दर्शन झाले होते. वाघ साक्षात समोर दिसताच भयावह अवस्थेत तो झाडावर चढला होता. खाली वाघ आणि झाडावर तो अशी स्थिती निर्माण झाली होती. तसेच सुकनेगाव परिसरात बैलावर वाघाने हल्ला करून बैलाला जखमी केले होते.

गोडगाव शिवारात एक दिवसांपूर्वी मुरलीधर डबले यांच्या दोन गायीचा फडशा पडल्याची चर्चा ताजी असतानाच आज पुन्हा हमला झाल्याने पशुपालक संतप्त झाले असून वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
वणी: बातमीदार

Previous articleनालीचे सांडपाणी चक्क घरात
Next articleअखेर विद्यार्थ्यांना मिळाले शालेय वाहन
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.