Home Breaking News त्या …हत्येचे तीव्र पडसाद, शिकाऊ डॉक्टर संतप्त

त्या …हत्येचे तीव्र पडसाद, शिकाऊ डॉक्टर संतप्त

754

डीन चा राजीनामा, उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
रुग्णालयातील अवागमन बंद, रुग्णांची हेळसांड

वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय परिसरात बुधवारी रात्री MBBS मध्ये अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर धारदार शस्त्राने हल्ला चढविण्यात आला. यात त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने शिकाऊ डॉक्टर विद्यार्थी प्रचंड संतप्त झालेत.

शिकाऊ विद्यार्थ्यांनी दुसऱ्या दिवशी संपूर्ण रुग्णालय परिसर ‘सील’ करत अवागमन बंद पडले. अधिष्ठाता व पोलीस प्रशासनाचे प्रतिकात्मक पुतळे जाळले. जिल्हा प्रशासन तसेच पोलीस प्रशासनाने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र सर्व प्रयत्न असफल झालेत.

वैद्यकीय क्षेत्रात पाऊल ठेवत असलेल्या उमद्या तरुणांचा दुःखद अंत मन हेलवणारा आहे. अशोककुमार सुरेंद्र पाल ह्या MBBS अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची झालेली निर्घृण हत्या आणि ती सुद्धा महाविद्यालयाच्या प्रांगणात शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी आहे.

घडलेल्या घटनेचे गांभीर्य बघता वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यातच महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एम.बी. कांबळे यांनी रुग्णालयीन परिस्थिती तथा कायदा व सुव्यवस्था ह्या बाबी लक्षात घेता आपल्या प्रभारी अधिष्ठाता पदाचा राजीनामा आयुक्त वैद्यकीय शिक्षण यांचेकडे सोपवला आहे.

डॉ. अशोककुमार पाल यांचे हत्येप्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस प्रशासन अतिशय बारकाईने तपास यंत्रणा राबवत असून तांत्रिक बाबी तसेच परिस्थितीजन्य पुरावा याचे आकलन करीत आहे.

गुरुवारी संपूर्ण दिवसभर विद्यार्थ्यांनी केलेला आक्रोश व संतप्त भावना यामुळे तपासाला गती मिळाली नाही मात्र विद्यार्थ्यांनी संयम राखल्यास आरोपींचा छडा लवकरच लागेल असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. वैद्यकीय महाविद्यालय परिसरात घडलेल्या या निर्घृण हत्येमुळे चांगलीच खळबळ माजली असून हत्येचे नेमके कारण काय हे काही कालावधीतच स्पस्ट होणार आहे.
यवतमाळ: बातमीदार