Home वणी परिसर जागतिक शौचालय दिनाचे औचित्य आणि भूमिपूजन

जागतिक शौचालय दिनाचे औचित्य आणि भूमिपूजन

175

कोलगाव येथे पार पडला सोहळा

जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधत स्वच्छ भारत मिशन अभियाना अंतर्गत मारेगाव तालुक्यातील कोलगाव येथे दि. 19 नोव्हेंबर ला तीन लक्ष रुपये किमतीच्या सार्वजनिक शौचालयाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.

गावातीलच वयोवृद्ध महिला श्रीमती बहिणाबाई गणपत बलकी या वृद्ध महिलेच्या हस्ते पार पडलेल्या कार्यक्रमात तहसीलदार, गटविकास अधिकारी यांची उपस्थिती होती. याप्रसंगी बोलतांना सरपंच अभिषा निमसटकर म्हणाल्या की, शासन प्रशासनाशी समन्वय साधत गावाला शास्वत विकासाच्या पाऊल वाटेने पुढे नेऊ असे स्पष्ट केले.

आयोजीत सोहळ्याचे वेळी, स्वच्छ भारत मिशन अभियानाला यशस्वी करण्याबरोबरच, गावासह परिसरातुन कोविड 19 या महाभयंकर रोगाला संपविण्यासाठी गावात शंभर टक्के लसीकरण झालेच पाहिजे. हा मान कोलगाव ग्रामपंचायतीने मिळवावा असे आवाहन, मारेगांव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय वानखेडे यांनी ग्रामस्थांना केले.

आयोजीत सोहळ्याला पंचायत समिती मारेगांवचे गटसमन्वयक प्रदीप बोके, जलजिवन मिशनचे अभियंता दिनेश मंदे, सुरज निमसटकर तथा ग्रामपंचायत सचिव अमन रामटेके, सरपंच अभिषा राजु निमसटकर, उपसरपंच प्रदीप वासाडे, ग्रामपंचायत सदस्य जया जुनगरी, रवींद्र आत्राम, गुरुदास घोटेकर यांचेसह ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मारेगाव: बातमीदार

Previous articleवाघाने पाडला बकरीचा ‘फडशा’
Next articleगुटखा वाहतूक करणारी टोळी ‘जेरबंद’
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.